आज दिवसभर एकूण 69 कोरोना पॉझीटीव्ह. एकाचा मृत्यू. सीपीआरमध्ये 823 स्वॅबची तपासणी दिवसभर होणार आहे.
- जिल्ह्यात सुरु असलेले लॉकडाऊन शिथील करायचा की वाढवायचा याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.
- बेड अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
- बापाने कानशिलात लगावल्याने सहा वर्षाच्या मुलीचे डोके भिंतीवर अपटले. त्यात मुलगी गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शाहूपुरी पोलिसांनी उघडकीस आणला.
- भू-विकास बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा राज्य कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी माहीती दिली.